Thursday, April 30, 2020

१ मे,महाराष्ट्र दिन २०२० / 1 May ,Maharashtra Din 2020



2019 Happy Maharashtra Day Wishes, Quotes, SMS, Whatsapp Status ...





महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे.महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.
१ मे , ह्या दिवसाचे आणखी एक वैशष्ट्य म्हणजे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून जगभर साजरा केला जातो.

 महाराष्ट्राची भूमी हिला  छत्रपती  शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज यांचा दैदिप्मान, गौरवशाली इतिहास लाभला आहे आणि  स्वराज्याची राजधानी रायगड हा सुध्दा ह्याच पावन भूमीवर आहे.महाराष्ट्राची भूमी ही कर्मभूमी,वीरांची, साधुसंतांचा आणि अनेक बुध्दीमान लोकांचा जीवनप्रवास पाहिलेली भूमी आहे.






















जसे की आपणाला ठाऊक असेल की ह्याच महाराष्ट्राला एकसंघ आणि संयुक्त राखण्यासाठी मोठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागली आहे.




२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले.

त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले.

या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.

अश्यारितीने भारताच्या नकाशावर एक मराठी भाषिक राज्याची निर्मिती यशस्वी झाली. 
माझ्याकडून सर्व मराठी आणि महाराष्ट्रात राहत असलेल्या त्यासोबतच जगभरातील मराठी लोकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .

जय हिंद जय महाराष्ट्र .


अशाच दर्जेदार आणि उत्तम पोस्ट वाचण्यासाठी  blog share आणि follow  करा